Tuesday, November 1, 2011
सांजवात :
लहानपणा पासूनच आजोबांनी रोज संध्याकाळी भीमरूपी - रामरक्षा म्हणायची सवय लावली. बरोब्बर सात वाजता देवासमोर दिवा लावायचे , उदबत्ती लावायचे आणि वाटीभारून खडीसाखर ठेवायचे आजोबा. शांत बसून देवाची स्तोत्रे म्हणण्यामागे आणि ती पाठ होण्यामागे वाटीतल्या खाडीसाखारारेचा मोठा वाट होता. शुभंकरोतीने सुरुवात करून राम नाम जपाने शेवट व्हायचा.
आमचा परिपाठ असा असायचा ..........................
शुभंकरोती कल्याणं आरोग्यं धनसंपदा
शत्रुबुध्ही विनाशाय दीपज्योती नमोस्तुते
शत्रुबुध्ही विनाशाय दीपज्योती नमोस्तुते
दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडल मोतिहार
दिव्याला पाहून नमस्कार
दिव्याला पाहून नमस्कार
दिवा लावला देवापाशी
उजेड पडला तुळशीपाशी
माझा नमस्कार सर्व देवांपाशी
घरातली पीड़ा बाहेर जावुदे
बाहेरची लक्ष्मी घरात येवुदे
घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभुदे
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानु कोटी
मोरेश्वराबा तू घाल पोटी
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानु कोटी
मोरेश्वराबा तू घाल पोटी
शांताकारं भूजगशयनम पद्मनाभम सुरेशं
विश्वाधारम गगन सदृशं मेघ वर्णम शुभांगम
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगीभीरध्यानुगम्यं
वंदे विष्णुम भवभयहरम सर्व लोकैकनाथम
विश्वाधारम गगन सदृशं मेघ वर्णम शुभांगम
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगीभीरध्यानुगम्यं
वंदे विष्णुम भवभयहरम सर्व लोकैकनाथम
श्री गोपाल कृष्ण महाराज कि जय
उडाला उडाला कपि तो उडाला समुद्र लोटोनी लंकेत गेला
लंकेत जावून विचार केला नमस्कार माझा तया मारुतीला
लंकेत जावून विचार केला नमस्कार माझा तया मारुतीला
अनुदिनी अनुतापे तापलो राम राया
परम दिन दयाळा निरसी मोह माया
अचपळ मन माझे नावरे आवरीता
तुजवीण शीण होतो धाव रे धाव आता
परम दिन दयाळा निरसी मोह माया
अचपळ मन माझे नावरे आवरीता
तुजवीण शीण होतो धाव रे धाव आता
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र
तया आठविता महा पुण्य राशी
नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र
तया आठविता महा पुण्य राशी
नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी
शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे
वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वारांचे
कवी वाल्मिकासारिखा मान्य ज्यांचा
नमस्कार माझा सद्गुरू रामदासा
वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वारांचे
कवी वाल्मिकासारिखा मान्य ज्यांचा
नमस्कार माझा सद्गुरू रामदासा
गणपती तुझे नाव चांगले
या कुंदेनृ तुषार हर धावला
गणपती स्तोत्र





श्री राम जय राम जय जय राम - ११ वेळा
या बरोबरच आणखीही पाठांतर असायचे

Labels:
balaji arati,
bhimrupi,
ganapati atharvashirsha,
gayatri mantra,
gururbrahma,
karpur arati,
manache shlok,
pasaydan,
prasad,
ram nam nauka,
ramarasha,
shubhankaroti,
suryanamaskar,
vyankatesh stotra
Subscribe to:
Posts (Atom)